करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील पूर्ण झालेल्या एक कोटी रुपयांच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव मंगेश चिवटे, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे, नगरसेवक एडवोकेट नवनाथ राखुंडे, एडवोकेट महादेव कांबळे, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, अनिल माने युसुफ बागवान आयुब बागवान, रामहरी कांबळे, पिंटू शेठ गुगळे, ललित शेठ अग्रवाल, बाळासाहेब कोकीळ, रवींद्र सपकाळ, रमेश राखुंडे, राजेंद्र चिवटे, जयराज चिवटे, आकाश चिवटे आदी जण उपस्थित राहणार आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा शहराच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांचा विकास निधी दिला असून शिवसेनेचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या माध्यमातून नवीन अठरा कोटी रुपये करमाळा शहरातील रस्ते सुधारण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल आहे.

3 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 10 वा. राशीनपेठ येथील गटारीचे लोकार्पण, कानाड गल्ली येथील चाळीस लाख रुपये खर्चाचे सिमेंट रस्ते व गटारी, निकम घर ते महाराजा वाईन्स मार्ग रस्त्याचे गटारीचे काम या कामाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन भरत शेठ कांबळे, प्रवीण शेठ गायकवाड, रोहित कोरपे, विश्वास काळे, विकास काळे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *