करमाळा प्रतिनिधी

श्री कोटलिंग प्रतिष्ठान संचलित न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिखलठाण व समस्त ग्रामस्थ चिखलठाण यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रीडा विश्वातील महान तपस्वी भारतीय क्रिकेट संघातील महान फलंदाज रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड या दिग्गज क्रिकेट खेळाडूंचे प्रशिक्षक तसेच द्रोणाचार्य पुरस्कार विजेते याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिनेश लाड सर यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर गणेश (भाऊ) करे पाटील अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्था,  धनश्रीताई विकास गलांडे सरपंच चिखलठाण- १,  चंद्रकांत (काका) सरडे मा.व्हाईस चेअरमन आदिनाथ सहकारी साखर कारखाना,  राजेंद्र बारकुंड मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष,  किरण डोके उद्योजक के. डी. एक्सपोर्ट, दत्तात्रय सरडे मा.उपसभापती प.स.करमाळा, डॉ. ब्रिजेश बारकुंड, सुधीर पोळ, नवनाथ भानवसे मुख्य लेखापाल सोलापूर, दिनकर (नाना) सरडे संचालक मकाई सहकारी साखर कारखाना, विनय सोपटे सर, विश्वजीत तारू सर, वीरेन कुलकर्णी, गजेंद्र पोळ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच दीप प्रज्वलाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड यांनी केले. विशेष म्हणजे प्रशालेचा विद्यार्थी वनराज पोळ या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांला दिनेश लाड सरांनी या विद्यार्थ्यांचा खेळ पाहून दत्तक घेतले. या कार्यक्रमासाठी वनराज हा देखील उपस्थित होता.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. दिनेश लाड सरांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड व समस्थ ग्रामस्थ व मान्यवर यांनी केला. याचबरोबर लाड सरांचा सन्मान करताना यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी करमाळा तालुक्याच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन सन्मानित केले. त्यांनी अतिशय सुंदर रित्या आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर अन्य उपस्थित मान्यवरांचे सन्मानही करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना करमाळा तालुक्यातील चिखलठाण सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या तसेच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या न्यू इरा स्कूलचे विशेष कौतुक केले. दिनेश लाड सरांनी ही आपल्या भाषणातून ग्रामीण भागातून ही चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडू शकतात असेही सांगितले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत खाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रमोद हराळे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *