
करमाळा प्रतिनिधी
वस्ताद ग्रुप महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अभी (आप्पा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या निमित्ताने करमाळा – माढा तालुक्याचे माजी आमदार संजय (मामा) शिंदे यांच्या हस्ते रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमातील मुलांना भोजन व्यवस्था, वृक्ष वाटप, तसेच रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत सेवा, संवेदनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली, तर नेत्र तपासणी शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. अनाथ आश्रमातील मुलांसोबत भोजनाचा आनंद वाटून घेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले. तसेच वृक्ष वाटप व स्वच्छता अभियानातून पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी वस्ताद ग्रुप महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रक्तदाते, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी अभी (आप्पा) पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी करमाळा पंचायत समितीचे उपसभापती अजित विघ्ने, पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे व राजेंद्र धांबे, सुजित (तात्या) बागल, डॉ.गोरख गुळवे, देवळाली गावचे माजी सरपंच आशिष (अण्णा) गायकवाड, सरपंच पोपट बोराडे, पुरुषोत्तम भिसे व यावेळी वस्ताद ग्रुप व मित्रपरिवार उपस्थित होते.
