
करमाळा प्रतिनिधी
कमलादेवी स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये जिम्नॅस्टिकस व अथलेटिक्स क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण जीन मैदान येथील हॉलमध्ये 15 जुलै पासून सुरु होत आहे. प्रवेश नोंदणी चालू झालेली आहे. क्रीडा कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी तज्ञ क्रीडा परीक्षकांचे आपल्या लहान वयोगटातील पाल्यांना जिम्नॅस्टिकस व अथलेटिक्स खेळाची तंत्रशुद्ध क्रीडा कौशल्य शिकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

पालकांना विनंती आहे की, मुलांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी, लवचिकता, चपळाई, वेग, धाडस व ताकद वाढवण्यासाठी सर्व खेळांचा जननी असलेल्या जिम्नॅस्टिकस व अथलेटिक्स क्रीडा प्रकारचा खूप उपयोग होतो. आपसूकच भविष्यात इतर कोणतेही सांघिक खेळ खेळण्याची पायाभूत तयारी होऊन जाते म्हणूनच लहान वयोगटातील मुलांना खेळाची आवड निर्माण करून पारंगत करण्याची संधी घ्यावी.

अधिक माहिती साठी संपर्क निलेश भुसारे – 9881653566 / 9833138170
जिम्नॅस्टिकस ४ ते १३ वयोगटातील बालके सकाळी ७. १५ ते ८.३० संध्याकाळी ६ ते ७.३० यावेळेत सोमवार ते शनिवार होईल याची फी ५००/- रुपये राहील.
अथलेटिक्स ७ वर्ष ते १७ वयोगटातील बालके संध्याकाळी ६ ते ७.३० यावेळेत सोमवार ते शनिवार होईल याची फी ५००/- रुपये राहील.
खेळाचा गणवेश हाफ पॅन्ट, टी शर्ट, खेळाचे बूट, पायमोजे राहील.
क्रीडा प्रशिक्षणाचे ठिकाण – नामदेवराव जगताप क्रीडा केंद्र, जीन मैदान, करमाळा
प्रवेश फी – २००/- रुपये
प्रवेश घेताना प्रवेश फी २००/- व अधिक दोन महिन्याची शुल्क एकदम भरावे लागेल, क्रीडा प्रशिक्षण वर्गाला येताना क्रीडा गणवेश आवश्यक आहे, पिण्याच्या पाण्याची बाटली व नॅपकिन साठी बॅग असणे आवश्यक आहे, खेळाडू मुलांनी क्रीडा प्रशिक्षण वर्गाला येताना वर्ग सुरु होण्या अगोदर ५ मिनिटे पहिले हजार राहावे तसेच सराव संपल्यावर पालकांनी मुलांना घेण्यासाठी वेळेवर यावे आणि क्रीडा प्रशिक्षकाला सांगून मुलांना घेऊन जावे, क्रीडा प्रशिक्षण सरावाला गैरहजर राहिल्यास क्रीडा प्रशिक्षकांना लेखी कळवावे, क्रीडा प्रशिक्षण शुल्क प्रत्येक महिन्याच्या १० तारखे अगोदर भरावे लागेल.