करमाळा प्रतिनिधी

वैद वस्ती शाळेच्या आदर्श, कर्तव्यदक्ष, उपक्रमशील, मुख्याध्यापिका त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांची नोंद BHARAT HEROIC EMPEROR BOOK OFWORLD RECORDS मध्ये करण्यात आली आहे. गेल्या 32 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रफुल्लता सातपुते मॅडम यांनी ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट, डिजिटल शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री सक्षमीकरण, व सामाजिक जाणीव या सर्व अंगाने शैक्षणिक परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांच्या नवनवीन उपक्रमशील कार्यामुळे शिक्षक म्हणून त्यांनी साकारलेला आदर्श आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. BHARAT HEROIC EMPEROR BOOK OF WORLD RECORDS मध्ये नोंद झाल्याबद्दल करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, विस्तार अधिकारी टकले, नलवडे, प्रभावती जगताप मॅडम तसेच देवळाली केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार खाडे सर तसेच सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करमाळा तालुक्यात सह सोलापूर जिल्ह्याचा तसेच महाराष्ट्राचाही अभिमान वाढला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *