
करमाळा प्रतिनिधी
कमलाभवानी साखर कारखान्याचा नववा मोळी पूजन सोहळा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन (भाऊ) उबाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (काका) सरडे, मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका अध्यक्ष भरत (भाऊ) अवताडे, सोलापूर डी लेबर सोसा को फेडरेशन लि. चे संचालक मानसिंग (भैय्या) खंडागळे, मांगी विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुजित (तात्या) बागल, बोरगावचे सरपंच विनय ननवरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कारखान्याच्या विकासाची रूपरेषा सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली. मांगी विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुजिता (तात्या) बागल यांनी कमलाभवानी साखर कारखान्याच्या गाळप हंगामास शुभेच्छा दिल्या कारखाना बंद असताना देखील कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणारा हा पहिला कारखाना असेल असे प्रतिपादन त्यांनी केले आणि कमलाभवानी साखर कारखान्याच्या पाठीशी ऊस उत्पादक शेतकरी खंबीरपणे उभा असून गाळप चांगल्या प्रकारे होईल अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (काका) सरडे यांनी देखील आपले अभ्यासपूर्ण भाषण करून कारखान्याच्या विकासाची दशा आणि दिशा सांगितली त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करण्याची विनंती देखील त्यांनी केली त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी प्रमाणिकपणे काम करून कारखान्याच्या विकासास साथ द्यावी असे त्यांनी सांगून कारखान्याच्या गाळप हंगामास शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी देखील कारखान्याला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी कारखाना बंद असताना देखील चेअरमन यांनी पगारवाढ दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून सर्व कर्मचाऱ्यांना प्रमाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला त्याचप्रमाणे शिंदे कुटुंबियांच्या कोणत्याही कारखान्यास ऊस देणे म्हणजे पैशाची हमी असणे असे प्रतिपादन त्यांनी केले.
कमलाभवानी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह (दादा) शिंदे यांनी देखील आपले अभ्यासपूर्ण भाषण करून कारखान्याच्या समोर असणारी आव्हाने आणि त्यावरील असणारे उपाय योजना बद्दल माहिती दिली त्याचप्रमाणे शासनाचा MSP संदर्भात योग्य निर्णय झाल्यास प्रत्येक कारखान्याला चांगल्या प्रकारचा भाव देता येईल अशी देखील आशा त्यांनी व्यक्त केले ऊसाच्या बाबतीमध्ये शासनाचे धोरण सकारात्मक असल्यास आपण चांगल्या प्रकारचा ऊस दर देणार असल्याचे आव्हान देखील त्यांनी केले त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांनी ही माझी संपत्ती आहे. हा माझा कारखाना आहे असे समजून काम करावे आणि कारखान्याच्या विकासाला हातभार लावावा असे आव्हान देखील त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना केले. त्याचबरोबर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याप्रमाणे आपण पहिला हप्ता देणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले. त्यानंतर अध्यक्ष भाषणामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन (भाऊ) उबाळे यांनी आपले शुभेच्छापर भाषण केले. त्यावेळी त्यांनी यावर्षी आम्ही शेतकऱ्याचे पेमेंट वेळेत देणार असल्याचा उल्लेख केला त्याचबरोबर कमलाभवानी साखर कारखाना इथून पुढील काळामध्ये प्रगतीपथावर जाऊन विकासाच्या योग्य मार्गावर जाईल असे देखील त्यांनी सांगितले. यावर्षी आम्ही लवकरात लवकर साखर विकून शेतकऱ्यांचे पेमेंट देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यावेळी अशपाक जमादार, अनिल केकान, अजित केकान, सागर काळे सर, अभिमान अवचर, पुढारीचे पत्रकार अशपाक सय्यद, शामराव गव्हाणे, सकाळचे पत्रकार दस्तगीर मुजावर, तेज वार्ताचे विशाल परदेशी, देवीचा माळ ग्रामपंचायतचे मा. सरपंच सिद्धेश्वर सोरटे, समाधान भोगे, तात्या मामा सरडे, नारायण नांगरे, विशाल परदेशी, बाप्पा चव्हाण, गव्हाणे, सागर काळे, अभिमान अवचार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मोळी पूजनाचा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी कारखान्याचे जनरल मॅनेजर अरविंद चौधरी, डेप्युटी जनरल मॅनेजर रामचंद्र क्षीरसागर, चीफ फायनान्स मॅनेजर आनंदराव उबाळे, वर्क्स मॅनेजर समाधान गायकवाड, चिफ केमिस्ट विनोद जाधव, मुख्य शेती अधिकारी जगदाळे, प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप, शेती अधिकारी पाटील, खरेदी अधिकारी सय्यद, ऊस पुरवठा अधिकारी सुजित शिंदे सिव्हिल इंजिनिअर कमलाकर टोणपे, सुरक्षा विभागाचे प्रमुख अनारसे व इतर सर्व कर्मचारी व कामगार बंधूंनी कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडला. त्यानंतर कमलाभवानी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी जगदाळे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित आमचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.