
करमाळा प्रतिनिधी
कै. बॉबीराजे उर्फ आदिनाथराजे राजेभोसले हे १९७४ पासून पश्चिम भागात सामाजिक काम करत होते. कुठली ही जात पात न पाहता सर्व सामान्य जनतेचे ते राजे होते. अन्यायाची त्यांना खूप चीड होती. जिंती औट पोस्ट पोलिस चौकी गेले कित्येक दिवस बंद असत राजांचे काम असे होते की कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होतील असे एक ही वातावरण होऊ देत नव्हते. जनतेचे काम व्हावे यासाठी ते राजकारणात गेले आणि प्रथम जिल्हा परिषद मध्ये अर्थ व बांधकाम खात्याचे सभापती म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते १९९६ मध्ये आमदारकीचे निवडून येणारे व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते पण काही कारणास्तव तिकीट न मिळाल्याने ते आमदारकीच्या रिंगणात उतरू शकले नाही. त्यांच्या नंतर नितीनराजे सुद्धा वडिलांचा वारसा तसाच जोपासत गेले १८ वर्ष जनतेचे काम प्रत्यक्षात आणि फोनवरून सोडवतात. एवढेच नव्हे तर दर शनिवार रविवार ते पुण्यावरून येऊन

जनतेसाठी कायदा आणि त्यात येणाऱ्या अडचणी मोफत सोडवतात. शेताचे वाद असो की बांधाची मोजणी ते स्वतः हजर असतात. मुलांसाठी तर त्यांनी स्व खर्चांनी तब्बल २ लाख रक्कमेची तालीम बांधून दिली, त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवले. ते कोणावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी प्रयत्नात असतात आणि बाजू सुद्धा त्याच व्यक्तीची घेतात ज्याची बाजू बरोबर आहे. क्रिकेटच्या टूर्णामेंट भरवणे, रक्तदान शिबिर भरवणे, सामाजिक अडचणी सोडवणे, गोर गरिबांना वीनामूल्य मदत करणे असे ते सर्व काम राजकारण म्हणून करतात. सरकारी कामातला भ्रष्टाचार त्यांना सहन होत नाही तो उघडकीस आणणे थेट प्रश्न अधिकाऱ्यांना विचारणे ही त्यांची खासियत आहे. अतिशय मितभाषी, शैक्षणिक उंची प्री. पी.एच.डी (law) असणारे एकदम मदतीस धाऊन येणारे व्यक्ती मंजे नितीनराजे, कायदा, शेती, समाजकार्य, आणि त्यासाठी गरज पडल्यास राजकारण सिद्ध करायची वेळ पडली तरी त्याची तयारी असणारा जनतेमधला सर्वांचा हक्काचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन राजेभोसले यांच्या नावाची चर्चा आहे. कोर्टी जिल्हा परिषद गटातून योगीनीराजे नितीन राजेभोसले किंवा केत्तुर गणातुन पंचायत समितीसाठी उपाध्यक्ष नितीन राजेभोसले यांच्या नावाची चर्चा होत आहे.