करमाळा प्रतिनिधी

मांजरगांव ता.करमाळा येथे बलीप्रतिपदेचे औचित्य साधून बळीराजा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. सजविलेल्या बैलगाडीतून ढोल ताशाच्या गजरात आणि लेझीमाच्या तालावर बळीराजाच्या प्रतिमेची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये फेटे बाधलेले शेतकरी, तरूण व महिला माता-भागिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. “इडा-पिडा टळो बळीचे राज्य येवो” अशी आराधना करून ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती संतोष पाटील, माजी सरपंच साधना खरात व ग्रामपंचायतीच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी “बळीला वंदुया” ही बळीवंदना म्हणून बळीराजाचा इतिहास कथन केला.

यावेळी कल्याण डोंबवली महानगर पालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे, अहिल्यानगरचे कामगार उपायुक्त भिसले, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर, कल्याण डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक हनुमंत हुंबे, मराठा सेवासंघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास बाळासाहेब झोळ, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन खटके, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक नागेश कांबळे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुहास पोळ, शिक्षण विस्तार अधिकारी हनुमंत ढेरे, रिटेवाडीचे सरपंच किशोर रिटे, माजी सरपंच दादासाहेब कोकरे, मकाईचे संचालक संतोष पाटील, माजी संरपंच कल्याण मोरे, तुकोबाय वाचनालयाचे अध्यक्ष प्रभाकर मोरे, पोलिस हवालदार नितीन चव्हाण, माजी उपसरपंच नवनाथ चव्हाण, दादासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. जय हनुमान लेझीम मंडळ, तुकोबाराय वाचनालयाचे पदाधिकारी व श्री स्टॉक मार्केट ॲकेडमीचे गणेश हुंबे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *