करमाळा प्रतिनिधी

खांबेवाडी येथील अमित नानासाहेब लांडगे यांची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल खांबेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मेजर शंकर कोळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर, करमाळा ग्राहक पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रा. शशिकांत नरुटे, पांडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच विलास कोळेकर, प्रगतशील बागायतदार धनंजय कोळेकर उपस्थित होते. घरची परिस्थिती बिकट असताना त्या परिस्थितीवर मात करून अमित लांडगे यांनी अथक प्रयत्नातून पोलीस भरतीचा सराव केला. त्यांचे आई-वडील दररोज लोकांच्या मोल मजुरी करून त्यांनी मुलांना शिक्षण दिले. त्यांची तिन्ही मुले स्व कष्टातून चांगल्या प्रगतीपथावर आहेत. मेजर शंकर कोळेकर यांनी म्हटले की, खांबेवाडी गावातील युवकांनी अमित लांडगे यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची दिशा ठरवावी कष्ट केल्यानंतर फळ हे मिळतच असतं परिस्थितीचे भांडवल न करता युवकांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन यशस्वी वाटचाल करावी धनंजय कोळेकर यांनी आभार व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *