कमलाई नगरी

श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे.

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. 

दिवाळी पाडवा निमित्त बुधवार दिनांक २२.०९.२०२५. रोजी श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन कामास डॉ. हर्षवर्धन सुनिता राजकुमार माळवदकर रा. करमाळा यांच्या कडून रोख देणगी ११,००१/- (आकरा हजार एक रु. फक्त) प्राप्त झाली आहे.

या निमित्त श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीकडून यांचा सत्कार पुरोहीत सुशील पुराणिक, व्यवस्थापक अशोक गाठे यांनी सत्कार केला आहे.

श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक मो. नं. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *