करमाळा प्रतिनिधी
शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर करमाळा तालुक्यातील हिवरवाडी गावात मनोज लांडगे यांच्याकडून प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्यानंतर करमाळा पोलीस निरिक्षक रणजित माने घटनास्थळी दाखल झाले होते. मनोज लांडगे यांना सध्या कैद करण्यात आले आहे. चिवटे यांच्यावर करमाळा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान विविध वृतवाहिन्यांशी संवाद साधताना चिवटे यांनी या हल्यामागे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, शिंदे सेनेचेच युवानेते दिग्विजय बागल यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दिग्विजय बागल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदार संघातील उमेदवार होते, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यावेळेस प्रचारात आघाडीवर होते. निवडणूकीनंतर दोघांमध्ये अंतर्गत वाद सूरू झाले.
सोलापूर येथील पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत चिवटे व बागल यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी करताना दिग्विजय बागल यांनी “मला बघून घेतो” म्हणून धमकी दिल्याची तक्रार महेश चिवटे यांनी पोलीसात दिली होती.
हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांने त्याच्या मोबाईल मध्ये व्हिडीओ सुरू करून तु खुप मोठा नेता लागून गेला आहे का ? तु रश्मी बागल व दिग्विजय बागल यांची माफी माग, हि शेवटची वार्निंग आहे अशी धमकी दिल्याचे आरोप चिवटे यांनी केले आहेत.
……
जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मारहाण प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही – दिग्विजय बागल
आज सकाळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात माझा व रश्मी दीदींचा कोणताही संबंध नाही. मला याची कल्पनाही नव्हती. याबद्दल मला सकाळी मंगेश चिवटे यांचा फोन आल्यानंतर कळाले असे दिग्विजय बागल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.