करमाळा प्रतिनिधी

युनिटी वेलनेस क्लब पुणे यांचेमार्फत आनंदी लॉन्स मंगल कार्यालय पोथरे या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत शरीर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला करमाळा पोथरे आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये वजन, शरीरातील फॅट, शरीराचे वय, स्नायूची स्थिती, पोटावरील फॅट, बी एम आय, रक्तदाब आणि शुगरची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी युनिटी वेलनेस क्लब पुणे येथून सुप्रीम कोच तानाजी कदम तसेच त्यांचे

सोबत सुपर कोच टीम मध्ये मृदुला कदम, सुनील फरगडे, अर्चना फरगडे, तसेच वेलनेस कोच प्रज्ञा पाटील आणि प्रवीण पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोथरे गावचे सरपंच इंजिनीयर अंकुश दादा शिंदे तसेच करमाळा खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष प्रभाकर शिंदे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुप्रीम कोच तानाजी कदम यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात उद्भवणाऱ्या विविध आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार याचे महत्त्व विशद केले. निकोप आरोग्यासाठी व्यायामाबरोबर चिंतन, मनन आणि सकस आहाराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच अंकुश दादा शिंदे यांनी अशा प्रकारच्या आरोग्यविषयक कॅम्पचे गरज आणि महत्त्व सांगितले. त्याचबरोबर वारंवार अशी कॅम्प आयोजित करावे अशी सूचना केली. यावेळी आनंदी लॉन्स मंगल कार्यालयाचे कार्यवाहक बाळासाहेब होसिंग यांनी वेलनेस व्यायाम पद्धती आणि आहारामुळे त्यांच्या आरोग्यात झालेल्या अमुलाग्र बदलाबद्दल आपला यशस्वी अनुभव कथन केला. या शिबिरामध्ये एकूण दोनशे लोकांनी आरोग्य तपासणी करून या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरी नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद कुलकर्णी यांनी केले यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *