करमाळा प्रतिनिधी

जेऊर ता. करमाळा येथील भारत महाविद्यालयामध्ये हिदी विभागाच्यावतीने दर्पण या विद्यार्थ्यांचा हस्तलिखीत हिंदी साहित्यविषयक भित्तीपत्रकाचे अनावरण प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांचे हस्ते संपन्न झाले. विद्यार्थांच्या सर्जनशील लिहत्या हातांना बळ देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा असून यामुळे विद्यार्थ्याच्या लेखनानुभव अधिकाधिक समृद्ध होत जातो असे मत हिंदी विभाग प्रमुख डॉ.पंडित बन्ने यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात व्यक्त केले. यावेळी डॉ. संजय चौधरी, डॉ.सुनिता कांबळे, प्रा.तुकाराम आघाव, प्रा.अनिल मुंगुसकर, डॉ.नवनाथ गाडेकर, कानिफनाथ आगम आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हिंदी दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा समारंभ यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *