करमाळा प्रतिनिधी  

सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत शालेय करमाळा तालुका स्तरीय 14 वर्षाखालील लांब उडी (मुले) स्पर्धेत ऋतुराज नागनाथ सरडे (इयत्ता – सातवी) याने प्रथम क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील तिहेरी उडी (मुले) स्पर्धेत श्रेयश धनेश्वर सरडे (इयत्ता – दहावी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील हातोडा फेक (मुले) स्पर्धेत संकेत शिवाजी लोखंडे (इयत्ता – दहावी) याने प्रथम क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील कुस्ती 46 कि. वजन गट (मुली) स्पर्धेत अनुष्का महेंद्र शिंदे (इयत्ता – अकरावी) हिने प्रथम क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील तिहेरी उडी (मुली) स्पर्धेत तृप्ती महादेव डंगाने (इयत्ता – अकरावी) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तर अंकिता संतोष शिंदे (इयत्ता – दहावी) हिने तृतीय क्रमांक पटकावला. 14 वर्षाखालील (मुली ) 4 ×100 रिले स्पर्धेत सई ज्ञानदेव सरडे, परी बाबुराव लबडे, अनुष्का राजेंद्र पाटील, सानवी दादासाहेब कदम (इयत्ता- सातवी), समृद्धी सचिन बोराडे (इयत्ता आठवी) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. याचबरोबर 14 वर्षाखालील (मुले) 4×100 रिले स्पर्धेत ऋतुराज नागनाथ सरडे, केतन दादाराम पोरे, प्रणव सचिन धारक, आदित्य गणेश सलगर, प्रथमेश गणेश चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला. याचबरोबर 14 वर्षाखालील 100 मी. रनिंग स्पर्धेत ऋतुराज नागनाथ सरडे (इयत्ता- सातवी) याने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच 14 वर्षाखालील 600 मी. रनिंग स्पर्धेमध्ये  केतन दादाराम पोरे (इयत्ता -आठवी) यानेदेखील तृतीय क्रमांक मिळवला. तसेच 14 वर्षाखालील हर्डल्स स्पर्धेत (मुली) समृद्धी सचिन बोराडे (इयत्ता- आठवी) हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तर अनुष्का राजेंद्र पाटील (इयत्ता- सातवी) हिने तृतीय क्रमांक मिळवला.

रीलपैकी एकूण सहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

सर्व विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक शेवाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या सर्व जिल्हास्तर खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी संस्थाप्रमुख – डॉ. ब्रिजेश बारकुंड, संस्थेच्या मार्गदर्शिका विद्याताई बारकुंड, मुख्याध्यापक आनंद कसबे सर, उपमुख्याध्यापक प्रमोद हराळे सर, कॉलेज विभाग प्रमुख सुशांत शिंदे सर यांनी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *