
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेच्या दहीगाव पंपींग स्टेशन येथे इलेक्ट्रिक मोटार पंप बसविणे, दहीगाव जॅकवेल येथे नवीन २१५ अश्वशक्ती पंप मोटार व स्टार्टर बसविण्याकामी जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कडुन दिनांक २० ऑगष्ट रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असुन एक कोटी एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे त्र्यान्नऊ रूपये मंजूर झाले असून करमाळा नगरपरिषदेने अद्याप पर्यंत सदर कामाची निविदा काढली नाही. सदर कामाची निविदा त्वरित काढण्यात यावी यासाठी करमाळा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका बानु फारुक जमादार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

जमादार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा शहराचा पाणीपुरवठा संपूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. चार चार दिवस शहरास पाणीपुरवठा होत नाही. शहरातील नागरिक पाण्यावाचून हाल भोगत आहे. प्रशासकीय मान्यता मिळुन सुध्दा नगरपरिषद निविदा काढण्यास उदासीन असलेचे दिसत आहे. तरी लवकरात लवकर निविदा काढण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती पालकमंत्री सोलापूर, जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले आहे.