करमाळा प्रतिनिधी
सोलापूर पोलीस उपआयुक्त विजय कबाडे साहेब यांच्या हस्ते प्रशासनरत्न कृतज्ञता सन्मान पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना देऊन गौरविण्यात आले होते. दैनिक एकमतच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा.आ. धनाजी साठे, व्यवस्थापक संपादक मंगेश देशपांडे,जाहिरात व्यवस्थापक संदीप तिरूखे, दैनिक एकमतचे सोलापूर आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर, करमाळा तालुका प्रतिनिधी जयंत दळवी, आजी माजी आमदार, विविध क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशासनरत्न कृतज्ञता सन्मान खालील कामगिरीमुळे मिळाला आहे. पी आय रणजीत नारायणराव माने सध्या नेमणूक करमाळा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण…. मी मूळचा हडपसर पुणे येथील असून शालेय शिक्षण हे साधना विद्यालय हडपसर व अण्णासाहेब मगर महाविद्यालय पुणे येथे झालेले आहे… 2008 स*** पीएसआय पदी निवड झाल्यानंतर माझे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे पार पडले ..त्यानंतर माझी पहिली पोस्टिंग ही पीएसआय म्हणून बीड जिल्ह्यामध्ये झाली.. बीड जिल्ह्यामध्ये असताना आदरणीय एसपी सर श्री रविंद्र सेनगावकर सर यांच्या करड्या शिस्तीमध्ये माझा परिविक्षाधीन कालावधी पार पडलेला आहे… सदर वेळी डीवायएस म्हणून श्री संभाजी कदम सर हे होते… बीड येथे असताना आदरणीय रविंद्र सेनगावकर सरांनी आम्हाला पूर्ण जिल्ह्यामध्ये कोठेही जाऊन अवैध धंदे बंद करण्याची परवानगी दिलेली होती… त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात फिरून विविध ठिकाणी दारू.. जुगार.. मटका ..हवाला… रॉकेल …अशा विविध प्रकारचे अवैध धंदे रेड करण्याची संधी मिळाली… त्याचप्रमाणे बीड येथे असताना बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर 54 लाखांचा रॉबरी झालेली होती… सदर गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली… त्याचप्रमाणे बीड येथे असताना 25 लाख रुपयांची हवाला रॅकेट उघडकीस आणलेले आहे… तसेच बीड येथे सीमी चा कार्यकर्ता असलेला गुजरखान यास अटक केलेली होती. त्याचप्रमाणे पत्रकार संजय मालानि याच्यावर जीवघेंना हल्ला झाला होता.. सदर आरोपी यांनी तोंडाला काळे फडके बांधून त्यांच्या वरती हल्ला केलेला होता….

सदरचा गुन्हा उघडकीस येणे अतिशय कठीण होते… सदरचा संवेदनशील गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल तत्कालीन एस पी श्री दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते 26 जानेवारीला प्रशस्तीपत्र मिळालेले आहे…. त्याचप्रमाणे बीड शहरातील हिंदू मुस्लिम दंगलींमध्ये … घडलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यातील आरोपी अटक केलेली आहेत… त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून माझी सोलापूर शहरांमध्ये बदली झाली …त्यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त श्री प्रदीप रासकर यांनी मला फौजदार चावडी पोलीस ठाणे मध्ये काम करण्याची संधी दिली ….तेथे मी नवी वेस पोलीस चौकी व मरीआई पोलीस चौकी येथे काम केले… त्यानंतर मला तत्कालीन पोलीस आयुक्त श्री रवींद्र सेनगावकर सर यांनी क्राईम ब्रँच येथे काम करण्याची संधी दिली …क्राईम ब्रँच मध्ये काम करत असताना अनेक चोऱ्या… घरफोड्या.. रॉबरी.. दरोडे.. उघडकीस आणलेले आहेत .. त्यामध्ये इराणी गॅंग …बाहेर राज्यातून चोरी करणाऱ्या गँग पकडलेले आहेत…. त्यावेळी एकूण 13 पिस्टल देखील जप्त केले होते… त्यामध्ये भागलपुर बिहार ….दिल्ली हरियाणा… गाजियाबाद . उत्तर प्रदेश..राजस्थान ..कर्नाटक.. तेलंगणा… आंध्र प्रदेश… येथे जाऊन आरोपी अटक केलेले आहेत…. भागलपुर बिहार मधून 21 तोळे सोन्याची रिकवरी रवी सोनी या आरोपीकडून केलेली होती …सदर चांगल्या कामगिरीबद्दल 2020 स*** मला पोलीस महासंचालक पदक देखील मिळालेले आहे… त्याचबरोबर त्यावेळी एकूण 13 पिस्टल देखील रिकव्हर केलेले होते… सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे काम करताना मला पोलीस आयुक्त श्री प्रदीप रासकर श्री रविंद्र सेनगावकर सर .. श्री महादेव तांबडे सर श्री अंकुश शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले… त्याचप्रमाणे डीसीपी पौर्णिमा चौगुले मॅडम शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम .. श्री बापू बांगर सर…श्री अभय डोंगरे सर यांचे देखील मार्गदर्शन लाभलेले आहे… त्यानंतर नाशिक एलसीबी येथे काम करण्याचे संधी मिळाली… तेथे क्रिटिकल खुनाचे गुन्हे ओपन केले आहेत… त्यानंतर माझे प्रमोशन पोलीस निरीक्षक पदी झाले . .त्यावेळी सोलापूर ग्रामीण येथे आदरणीय तेजस्वी सातपुते मॅडम यांचे रीडर म्हणून काम पाहिले… त्यांनी मला मंगळवेढा पोलीस ठाणे ते काम करण्याची संधी दिली… मंगळवेढा पोलीस ठाणे येथे मी त्यावेळी उघडकीस न आलेले दोन दरोडे तात्काळ उघडकीस आणले… त्यावेळी त्यांनी मला तेथे कायमस्वरूपी ऑर्डर केली …. त्यानंतर मी मंगळवेढ्यात काम करताना एकूण 70 ते 80 गुन्हे उघडकीस आलेले आहेत… त्यामध्ये चोऱ्या ..घरफोड्या.. दरोडे रॉबरी.. मोटर सायकल चोरी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत …तसेच मंगळवेढा येथे झालेल्या तिहेरी मर्डर प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक केली होती… मंगळवेढ्यात काम करत असताना 69 वाळूच्या गाड्यांवरती कारवाई केलेली होती… अनेक गुन्हेगारांना तडीपार केले होते… त्याचप्रमाणे तेथील सीमा वरती भाग असल्यामुळे बालविवाह करण्याची पद्धती होती …अनेक बालविवाह यावेळी आम्ही रोखण्यात यशस्वी झालो होतो …तसेच कर्नाटक हद्दी मधून येणाऱ्या गुटख्याच्या मोठ्या 21 गाड्या पकडून कोट्यावधी रुपयांचा गुटख्याचा म** जप्त केलेला आहे.. मंगळवेढ्यामध्ये काम करत असताना एकूण 794 अवैध धंद्यांच्या कारवाया केलेल्या आहेत ….त्याचप्रमाणे मंगळवेढा येथे 26/ 11/ रोजी घेतलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 515 जणांनी सहभाग घेतलेला होता… तसेच मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये एक सुसज्ज ओपन जिम तयार केलेले आहे .. तेथे देखील वृक्षारोपण करून मंगळवेढा पोलीस ठाण्याचे नूतनीकरण केलेले आहे ….सदर ठिकाणी 2 दरोडे 7 जबरी चोऱ्या 31 घरफोड्या व 35 चोऱ्या उघडकीस आणलेले आहेत … सदर वेळी तेथे मला माननीय तेजस्वी सातपुते मॅडम …तसेच एसपी सर श्री शिरीष सरदेशपांडे सर… ॲडिशनल एस पी श्री हिम्मत जाधव सर… श्री अतुल झेंडे सर…श्रीमती राजश्री पाटील डी वाय एस पी मॅडम व विक्रांत गायकवाड डीवायएसपी सर यांचे मार्गदर्शन लाभले… त्यानंतर मंगळवेढातला कालावधी संपल्यानंतर माझी बदली नियंत्रण कक्ष येथे झाली. त्यावेळी मला आदरणीय ॲडिशनल एसपी सर प्रीतम यावलकर सर यांनी तात्पुरत्या कालावधीसाठी म्हणजे फक्त एका आठवड्यासाठी मोहोळ पोलीस स्टेशन चा चार्ज दिलेला होता.. त्यावेळी मोहोळ पोलीस ठाणे येथे चार्ज घेताच… तेथे मिसिंग दाखल होती… सदर मिसिंग मधील व्यक्ती कृष्णा चामे राहणार यल्लमवाडी तालुका मोहोळ. . मूळ राहणार लातूर हा दोन-तीन दिवसांपूर्वी राहत्या घरातून बेपत्ता झाले बाबतची माहिती मिळाली होती…. सदर गुन्ह्यात सलग सहा ते सात दिवस तपास करून सदर शोध लावला असता त्या व्यक्तीचा सालगड्यानेच खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते घराच्या पाठीमागे ड्रेनेज मध्ये पुरलेले होते व त्याचे अंगावरील 19 तोळे सोन्याचे दागिने देखील लुबाडून ते देखील जमिनीमध्ये पुरले होते ….सदर प्रकरणाचा कसोशीने शोध घेऊन ते सर्व जप्त केलेले आहेत… सदर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल मला क्राईम मीटिंगमध्ये माननीय एसपी सर श्री अतुल कुलकर्णी सर यांचे हस्ते बेस्ट डिटेक्शनचे प्रशस्तीपत्र मिळालेले आहे…. त्याचप्रमाणे यापूर्वी आम्ही माननीय तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या दारूबंदी धोरणासाठी ऑपरेशन परिवर्तन… पारधी समाजासाठी… पहाट प्रोग्रॅम… हा पारधी समाजासाठी त्यांच्या कल्याणासाठी असलेला उपक्रम घेतलेला आहे…. करमाळा येथे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी मार्गावर 2500 झाडांचे वृक्षारोपण केलेले आहे .. करमाळा येथे देखील काम करत असताना अनेक स्टैंड वरील चोऱ्या… बाजारातील चोऱ्या… घरफोड्या.,. अनेक रॉबऱ्या .. तसेच ड्रॉप चे प्रकार मोटरसायकल चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आणलेले आहेत…… सदर चांगल्या कामगिरीसाठी मला आत्तापर्यंत 1…पोलीस महासंचालक पदक 2020… 2. कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यामध्ये दोन पदके मिळालेले आहेत… त्याचप्रमाणे नाशिक येथील राज्यस्तरीय कर्तव्य मेळाव्यामध्ये देखील एक पदक मिळालेले आहे…… आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये साधारण अंदाजे अडीच ते तीन किलो सोने चांदीचे दागिने जप्त केलेले असून एकूण 13 पिस्टल रिकव्हर केलेले आहेत…3…. आतापर्यंत मला एकूण 280 रिवार्ड मिळालेले असून चांगल्या कामगिरीसाठी 50 प्रशस्तीपत्रे मिळालेली आहेत….. सदर ची कामगिरी करत असताना मला आमचे माननीय एसपी सर श्री अतुल कुलकर्णी सर व एडिशनल एसपी श्री प्रीतम यावलकर सर …. आयपीएस श्रीमती अंजना कृष्णा तसेच डीवायएसपी अजित पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे….