
करमाळा प्रतिनिधी
आज करमाळा शहरातील मुख्य बाजार पेठेतील (मेनरोड) वाहतुक कोंडी संदर्भात पोलीस निरीक्षक रणजित माने यांची भेट घेत राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी (व्यापार आघाडी )च्या वतीने निवेदन दिले.

करमाळा बाजार समितीचे माजी संचालक संतोष वारे, प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रसाद भैय्या जगताप, शहर अध्यक्ष सोहेल बागवान, किशोर नरारे, विवेक शिंदे, महेश ममदापूरे, निलेश घाडगे, केदार राजमाने, रोहित वनारसे, आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) चे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थितीत होते.
