करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमाचा उच्चांक मिळवणारी मुथा अबॅकस च्या संस्थापिका ज्योती मुथा यांना 17 ऑगस्ट रोजी जयपूर येथे हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड चा बेस्ट अबॅकस टीचर म्हणून अवॉर्ड मिळाला. या कार्यक्रमासाठी पूर्ण भारत देशामधून फक्त शंभर शिक्षकांना हा सन्मान देण्यात आला.

नगर जिल्हा व सोलापूर जिल्हा मधून प्रा. ज्योती मुथा यांची निवड त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व अबॅकस क्षेत्रातील त्यांचा अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश दिव्य मराठी यांचाही नारीशक्ती गौरव हा पुरस्कार या सर्व संदर्भाचा विचार करून हा अवॉर्ड त्यांना घोषित करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुवर्णपदक सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

सर्व शैक्षणिक क्षेत्रामधून त्यांचे अभिनंदन होत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन जयपूर येथील चीफ एडिटर अँड डायरेक्टर ऑफ हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड अभिषेक सोनी यांनी केले व कार्यक्रमासाठी कपिल शर्मा यांची ही आवर्जून उपस्थिती तेथे होती. करमाळा जैन श्री श्रावक संघातर्फे ही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या यशाच्या पाठीमागे आई-वडील व दिनेश मुथा यांचे अनमोल सहकार्य मार्गदर्शन लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *