
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहराला सध्या चार ते पाच दिवसा नंतर पाणीपुरवठा होतो. दहिगाव येथील करमाळा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या विद्युत मोटारी पंचवीस वर्षे जुने असल्यामुळे सातत्याने बंद पडतात त्यामुळे पाणी उपसा होत नाही शहराला पाणी कमी पडते. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मागणीनुसार तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या मोटारी खरेदीसाठी निधी मंजूर केला होता पण काही तांत्रिक अडचणी व राजकीय कुरगोडीमुळे हे काम रखडले होते मात्र याचा फटका सर्वसामान्य करमाळा शहरातील जनतेला बसत होता. गेली एक वर्षभरापासून हा प्रश्न प्रलंबित होता. आज यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली, यातील तांत्रिक अडचणी दूर करून तात्काळ या कामाला प्रशासकीय मंजुरी द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. आता नवीन विद्युत मोटारी मिळणार असल्यामुळे दहीगाव येथून पूर्ण दाबाने पाणी उपसा होऊन करमाळा शहराला दररोज पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दहिगाव येथील नगरपालिकेचे पाणीपुरवठा योजनेला दहा किलोमीटर अंतरावरील जेऊर सब स्टेशन येथून विज पुरवठा केला जातो पण या जॅकलीन शेजारी 200 मीटर अंतरावर दहिगाव विद्युत सबस्टेशन आहे. येथून करमाळा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला वीज कनेक्शन दिले तर पूर्ण क्षमतेने विजेचा दाब मिळून मोटारी पूर्ण क्षमतेने चलून करमाळ्याला कधीच पाणीपुरवठा कमी पडणार नाही मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकरी व काही लोकांच्या दबावाला बळी पडून दहीगाव सब स्टेशन वरून करमाळा पाणीपुरवठा योजनेला विद्युत कनेक्शन देत नाहीत हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निदर्शनास महेश चिवटे यांनी आणून दिली. यावर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
याबाबत बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, आता ही रक्कम मंजूर झाली असली तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ टेंडर प्रक्रिया राबवून चांगल्या दर्जेदार कंपन्यांच्या मोटारी खरेदी करून करमाळा शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा. वीज वितरण कंपनीने सुद्धा दहीगाव सब स्टेशन करमाळ्याच्या पाणीपुरवठा योजनेला वीज पुरवठा द्यावा. ठराविक शेतकऱ्यांचा फायदा न बघता 50 हजार शहरवासी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे हे लक्षात घ्यावे अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना धडा शिकवावा लागेल.