करमाळा प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी शिवसेने कडून ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. करमाळा येथील उपविभागीय लिपिक हे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे ती रिक्त जागा भरावी यासाठी प्रशासनाचे कान उघडण्यासाठी हे आंदोलन केले गेले.

करमाळा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात ८०-९० किलोमीटर वरून सामान्य नागरिक अडचणी घेऊन येत असतो परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा येथे कोणताही जबाबदार अधिकारी उपलब्ध नसतो. करमाळा येथे उपविभागीय अभियंता यांच्याकडे अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2 च्या अतिरिक्त पदभार  असल्यामुळे तेही उपलब्ध नसतात व त्यांच्यानंतर महत्वाचे असलेले उपविभागीय लिपीक या पदावरील कर्मचारी मागील 2 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा येथे काम करीत नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची अडचण होत आहे. ह्या सर्व गोष्टीचे निवेदन तत्कालीन अधीक्षक अभियंता माळी यांना शिवसेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष ओबीसी/व्हिजेएनटी सुयश कर्चे यांनी दिले असता त्यांनी कार्यकारी अभियंता यांना सूचना दिल्या. त्यावेळेस कार्यकारी अभियंता अकलूज यांनी पत्राद्वारे सुयश कर्चे यांना आमच्या इथे स्टाफ कमी आहे त्यामुळे मी त्यांना करमाळ्यामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर पाठवत नाही इथे रिक्त पदावर माणसे आली की त्यांना करमाळ्याचा पदभार देतो असं पत्राद्वारे सांगण्यात आले.

त्यानंतर सुयश कर्चे यांची माळी अधिक्षक अभियंता यांचेकडे पाठपुरावा करून दोन वरिष्ठ लिपिक तिथे उपलब्ध करून घेतले तरीही तीन महिने उलटूनही कार्यकारी अभियंता करमाळा येथील वरिष्ठ लिपिक यांना करमाळा उपविभाग येथे पाठवण्यास तयार नाहीत. माळी यांनी त्यांची तातडीने बदली करमाळ्याकडे करावे असे सूचना दिल्या असतानाही कार्यकारी अभियंता यांनी मनमानी कारभार करून त्यांना तिथेच अकलूज येथे ठेवले आहे.

शिवसेना पदाधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा येथे आंदोलनाला आले असता तिथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.

आम्ही आंदोलनाचा निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर,.पोलीस अधीक्षक सोलापूर, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज व करमाळा उपविभागीय अभियंता यांना दिले होते. तरीदेखील आदेश असून सुद्धा करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी सर्व वरिष्ठ यांच्या आदेशाचा अवमान केला असून त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत असे सुयश कर्चे यांनी सांगितले.

 हे सर्वजण जर जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांचा आदेश मानत नसतील तर सर्वसामान्यांचे प्रश्न काय सोडवतील.

तसेच कार्यकारी अभियंता अकलूज हे उपविभागीय लिपीक यांना करमाळा येथील पदावर पाठवत नाहीत. त्यामुळे कार्यकारी अभियंता जाणूनबुजून करमाळा येथील जनतेची अवहेलना तर करत नसतील ना अशी शंका शिवसैनिक तसेच नागरिकांमध्ये असल्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर यांना कार्यकारी अभियंता यांचे कार्यभाराचे चौकशी आदेश द्यावेत अशी विनंती करणार आहोत. तसेच  कार्यकारी अभियंता यांनी करमाळा येथील उपविभागीय लिपिकाकडून आतापर्यंत करून घेतलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी केली असून येत्या आठवड्यात उपविभागीय लिपीक पदावरील कर्मचाऱ्यास करमाळा येथे पाठवावे अन्यथा जिल्हाधिकारी सोलापूर व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज या ठिकाणी तीव्रतेने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

सध्याच्या महायुती सरकारचे पारदर्शक व वेगवान शासकीय कामकाजाचे जे धोरण आहे त्याचा देखील कार्यकारी अभियंता अवमान करत असल्यामुळे शंका व्यक्त होत असून त्यांच्यावर लवकरात लवकर चौकशी बसवावी. भ्रष्ट कारभार केलेला असल्यास उघडकीस येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी भावना शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त होत आहे.

यावेळी शिवसेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष ओबीसी/व्हिजेएनटी सुयश कर्चे, श्रमिक कामगार संघटना शिंदे गट जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव, महिला जिल्हा अध्यक्षा ओबीसी/व्हिजेएनटी पद्मजाताई इंगवले (जगताप), जिल्हा संघटक संतोष वारगड, युवासेना अध्यक्ष नवनाथ गुंड, करमाळा संपर्क प्रमुख ओबीसी/व्हिजेएनटी निलेश पोटे, तालुका अध्यक्ष रमेश लगस, उपजिल्हा अध्यक्ष श्रीकांत गोसावी, तालुका उपाध्यक्ष दादा थोरात, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब तनपुरे, तालुका उपाध्यक्ष विलास कर्चे, करमाळा शहर उपप्रमुख अनिकेत यादव, उपाध्यक्ष बाळासाहेब कारंडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्तिथ होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *