करमाळा प्रतिनिधी

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देशभक्त कै. नामदेवराव जगताप मार्केट यार्ड मध्ये मुख्य कार्यालयीन  इमारती समोर बाजार समितीच्या उपसभापती शैलजा मेहेर यांच्या शुभहस्ते 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी, बाजार समितीचे संस्थापक देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक बबनराव मेहेर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक मनोज पितळे, सचिव विठ्ठल क्षीरसागर, सहसचिव रवींद्र उकिरडे, करमाळा तालुका गट सचिव पतसंस्थेचे चेअरमन अनिल सुरवसे यांचे सह कर्मचारी वृंद उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *