
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील भूगोल व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी ग्रंथालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अंकुश करपे यांनी प्रास्ताविक करत ग्रंथालयाची ओळख करून दिली. नंतर ग्रंथपाल सपना रामटेके यांनी ग्रंथालयात असलेल्या सर्व पुस्तकांबद्दल माहिती सांगितली तसेच ग्रंथालयात जवळजवळ 48 हजार पुस्तके आहेत असेही त्यांनी सांगितले. आभार विश्वंभर लांडगे यांनी मानले.
यावेळी भूगोल विभाग प्रमुख डॉ. विजया गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे, प्रा. सुपेकर, प्रा. बाबर, ग्रंथालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
