
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारकडून शासकीय योजनेतून शेतकऱ्यांना शेती पंपासाठी सोलर बसवण्यासाठी योजनांतर्गत सबसिडी सवलत देऊन सोलर बसवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. परंतु ही योजना राबवित असताना संबंधित कंपनीच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांना त्यांच्या स्व खर्चाने सोलर साठी खड्डे असेल, जमिणीत फाऊंडेशन साठी सिंमेट वाळु, वीट हे साहित्य मागितले जात आहे अशी तक्रार संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांच्या कडे शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

तरी यासंदर्भात संबंधित महावितरण च्या अधिकाऱ्यांनी फोन केला असता कोणताही खर्च शेतकऱ्यांकडून घेता येत नाही ते कंपनीच्या ठेकेदाराकडून केला जावा असा नियम असुन तसे असल्यास आमच्या कडे तक्रारी अर्ज करावा असे आव्हान करमाळा महावितरण कार्यालय यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान करून सावध करत आहेत असे कोणत्याही सोलर योजनांतर्गत ठेकेदाराकडून खर्च करण्यास मागणी होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना किवा महावितरण करमाळा यांच्याशी संपर्क साधावा आणी आगोदर कुणाकडून असा खर्च घेतला गेला असेल तरं त्यांनी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष मो.9011148077 या नंबर ला संपर्क साधावा. जय महाराष्ट्र