करमाळा प्रतिनिधी

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. आदिनाथनगर या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.

दिनांक 22 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध होऊन अध्यक्षपदी सतीश कानगुडे व उपाध्यक्षपदी पृथ्वीराज राजेभोसले यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी बेंढारे यांनी कामकाज पाहिले. निवडीवेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक बागनवर, ओएस  कदम व इतर अधिकारी तसेच पतसंस्थेचे सचिव मंगेश देवकर, पतसंस्थेचे नूतन संचालक सरक, आदलिंग,  शिंदे,  राखुंडे, बागल,  क्षीरसागर, कांबळे,  गुंड,  झिंजाडे, चव्हाण, पाटील, संस्थेचे कर्मचारी माने व कारखान्याचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व नवनिर्वाचित संचालकांचे करमाळा तालुक्याचे आमदार तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नारायण आबा पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र भैय्या पाटील, संचालक देवानंद बागल, चौधरी व युवा नेते जेउरचे सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *