
करमाळा प्रतिनिधी
लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात श्री जगदंबा कमला भवानी मूक निवासी शाळा करमाळा येथे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सातपुते सर हे होते तर प्रमूख पाहुणे म्हणून मुखध्यापक दत्तात्रय

काळे सर व कला शिक्षक गुरमे सर हे होते. यावेळी गणेश सातपुते सर यांनी लोकमान्य टिळक त्यांच्या विषयी आपले मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या कार्याची माहिती दिली व चंद्र शेखर आझाद यांच्या जयंती निमित्त

विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशेष शिक्षक शंकर येलाले सर यांनी केले तर आभार विशेष शिक्षक रोहन भालेराव सर यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
