
करमाळा प्रतीनिधी
मागील महिन्यामध्ये करमाळा मतदार संघात अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले तसेच काही राहती घरे पडली तर अनेक जनावरे दगावली. याबाबत विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्षात भेटुन निवेदन दिले तसेच नुकसान भरपाई मागणी केली. त्यांनी केलेल्या मागणीस आता यश आले असुन करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी

सांगितले की, आपण स्वतः कृषी अधिकारी तसेच महसुल विभागातील अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी मंडल अधिकारी, कृषी सहायक यांना बरोबर घेऊन नुकसान ग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तालुक्यातील केळी, कांदा, डाळींब, मका, उडीद आदिसह अनेक पिके अवकाळी पावसामुळे उध्वस्त झाली होती. तसेच नागरिकांच्या घरांची पडझड झाल्याचे दिसून आले. तर जनावरेही दगावली होती. याचा पंचनामा केला जावा अशी मागणी आपण तहसिलदार व जिल्हाधिकारी यांचेकडे केली. तसेच महसुल मंत्रीमहोदय यांना भेटून निवेदन दिले. आता यानुसार

शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. बागायत पिकांच्या नुकसानीपोटी एकुण ४५१६ शेतकऱ्यांना ८ कोटी ३९ लक्ष रुपये मिळावेत तसेच फळबागा व इतर पिकांपोटी ४१३४ शेतकऱ्यांना १४ कोटी ८३ लक्ष रुपये मिळावेत अशी मागणी होती. यानूसार तालुक्यातील एकुण ८८३० शेतकऱ्यांना त्यांच्या एकुण ७२२७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २३ कोटी २२ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली व संबंधित विभागाकडून तसा अहवाल वरीष्ठ कार्यालयात सादर झाला. घरटडझडी साठी १ कोटी

२७ लाख रुपये मिळले जाणार आहेत तर १२ लाभार्थ्यांना दगावलेल्या जनावरांच्या मोबदल्यात पैसे दिले जातील. यातील काही जणांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली तर उर्वरित शेतकऱ्यांना शासनाकडून पुढील रकमेचा हप्ता मंजुर होताच खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.