भाजपा अध्यक्ष अग्रवाल यांच्यावर हल्ला
करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचीत शहर अध्यक्ष जगदीश आग्रवाल यांचेवर भरदिवसा दु.३.० च्या दरम्यान आग्रवाल हब येथे हल्ला करण्यात आला.हा हल्ला गोधन बचावचे देवा कोकाटे व सहकारी यांनी हातातील दांडक्याचे सहाय्याने केल्याचे म्हटले जाते.तर आग्रवाल यांनीही कोयता सदृष्य शस्त्राने एका जणाचे हातावर वार केल्याचे प्रथम दर्शनी सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते.याबाबत रात्री उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू होते.हल्ला करणारे काहीजण फरार झाले.काहींना पोलिसांनी पकडले तर यातील कोकाटे रा इंदापूर नामक इसम स्वतः करमाळा पोलिस स्टेशनला हजर झाले. विचार धारेत दरि पडल्याने हल्लाभारतीय जनता पार्टी म्हटले कि कट्टर हिंदूत्व परंतु पक्षाचेपदे घेत अर्थपूर्ण हिंदूविरोधी, पक्ष विरोधी कार्यवाहीचे अनेक प्रकरणे करमाळा शहर व तालूक्यात घडत गेली.काही दिवसापूर्वीही मौलालीचा माळ येथे असा प्रकार घडला होता.भाजपाचे गणेश चिवटे व सहकारी यांनी सामंजस्यपणे तो मिटवला परंतु विचारधारेत दरी निर्माण झालेने असे प्रकार झाल्याचे म्हटले जात असले तरी या सर्व प्रकरणामागे बेकायदेशीर चालणारे व्यवसायाचा काही संबंध नाही ना याचाही तपास होणे पोलिसासमोर आव्हान आहे.
सदर प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास होणे गरजेचे असून स्थानिक प्रशासनावर राजकीय दबाव येत असल्यास जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वतः लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
पोलिस उपविभागीय अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक माने यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करीत आहेत
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अग्रवाल यांची भेट घेतली