करमाळा प्रतिनिधी

काल भारतीय जनता पार्टी मध्ये तालुक्यातील काही नेत्यांनी प्रवेश केला तो त्यांचा व्यक्तीगत भाग आहे परंतु भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे महायुती मधील घटक पक्ष आहेत. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मधील घटक पक्ष भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होणं म्हणजे आमच्या साठी देखील आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे महायुती मजबूत होऊन स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये महायुतीला तालुक्यात यश

मिळण्याचा मार्ग सोपा झाला त्या अनुषंगाने मी मुबंई येथे अधिवेशन साठी असताना मला तालुक्यातील काही नेते भाजप मध्ये प्रवेश करण्यासाठी आले आसल्याचे समजल्या वर मी त्यांच्या भेटी घेतल्या व अधिवेशन साठी गेलो. त्यांचा पक्ष प्रवेश झाला तेंव्हा मी अथवा माझे राजकीय सहकारी गौरव झांजूर्णे तेथे उपस्थित नव्हतो अथवा उपस्थित राहण्याचा काहीच

संबंधच येत नाही परंतु गैरसमजातून काही अति उत्साही कार्यकर्ते नी आमचे नाव चिठ्ठी वरती लिहून महसूल मंत्री बावनकुळे च्या कडे दिली व ती त्यांनी मिडीया समोर वाचून दाखवली त्यामुळे गैरसमज निर्माण झाला तरी आम्ही मा.आ.संजय मामा शिंदे यांच्या भूमिकेशी प्रमाणिक निष्ठेने राहून काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या रक्तात आहे त्यामुळे भाजप सोबत युती आहे परंतु आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत शिलेदार आहोत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *