
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर, अर्बन बँकेचे चेअरमन तथा देवी गटाचे नेते कन्हैयालाल देवी, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सूर्यकांत पाटील यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन

सिंह केदार, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. करमाळा तालुक्यामध्ये भाजप पक्षाचे काम घराघरापर्यंत पोचून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये

भाजपचे कमळ फुलण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने काम करणार असल्याचे प्रवेश केलेल्या नेत्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढली असून गटातटाच्या राजकारणामध्ये अडकलेली नेतेमंडळी भाजपमध्ये आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये नक्कीच भाजप सत्ता काबीज करणार असा विश्वास प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे.
