करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने बालगोपालांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी यांची पुजा व आरती करून झाली. या कार्यक्रमासाठी राधेश्याम मंगल कार्यालयाचे मालक बाळासाहेब जाधव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश बिले सर, सचिव युवराज बिले सर,

खजिनदार आशा बिले मॅडम, संचालिका स्वाती बिले मॅडम, मुख्याध्यापिका अमृता परदेशी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये बालगोपालांनी अनेक कलागुणांचा अविष्कार करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यामध्ये भक्तीगीते, रिंगण, फुगडी, मानोरा इत्यादी कलागुणांचा समावेश होतो. विध्यार्थ्यांमधून विठ्ठल व रुक्मिणी यांची मनमोहक

भूमिका साकारण्यात आली. पालकांनी मोठया प्रमाणात उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. टाळ, मृदूंग, हलगी व विठ्ठल नमाच्या गजरात सर्व परिसर अगदी दुमदुमून गेला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेच्या संचालिका, मुख्याध्यापिका,  सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप कष्ट घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *