कुर्डुवाडी प्रतिनिधी

कुर्डुवाडी येथे भगवान गड व नारायण गड या दिंड्यांचे आगमन झाल्यावर विठ्ठल मंदिर येथे कुर्डुवाडी नाभिक दुकानदार संघटने तर्फे दरवर्षीप्रमाणे मोफत दाढी कटींग करण्यात आली. यावेळी हजारो वारकऱ्यांनी सहभाग घेतला.  या कार्यक्रमाचे उद्घाटन भगवान गड चे विश्वस्य ह.भ.प.कृष्णाजी शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नाभिक समाजाचे

जेष्ठ नेते वसंतराव चौधरी, सुहास गाडेकर, दयानंद जाधव, शहर अध्यक्ष सागर राऊत, दत्ता वाघमारे, सज्जन लोंढे, श्रीकांत शेंडगे, कुमार दळवी, अमोल गाडेकर, योगेश सुर्वेकर, दत्ता राऊत, गणेश कोकाटे, अजित गाडेकर, दत्तात्रय क्षिरसागर, नितीन कोकाटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

हि सेवा करण्याची सलग दहावे वर्ष असल्याचे संघटने तर्फे सांगण्यात आले.

परिश्रम घेतलेल्या सर्वाचे हभप कृष्णाजी शास्त्री महाराज व हभप डॉ. जयंत करंदीकर यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *