करमाळा प्रतिनिधी

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याला 140 कोटी आले त्यातील 35 कोटी कर्मचाऱ्यांच्या पेमेंटसाठी आले आहे परंतु बिगर कागदावरील नेतृत्व पेमेंट देत नाही यामुळे याही वर्षी कारखाना चालू होत नाही अशी माहिती माजी चेअरमन अप्पासाहेब झांजुर्णे यांनी दिली आहे.

झांजुर्णे म्हणाले की, मकाई कारखाना या भागात हवा शेतकऱ्यांची मुलांना काम मिळावे म्हणून त्याकाळी विलासराव घुमरे सर व मी तीस तीस हजार रुपये एकरानी मकाईसाठी जमिनी विकत घेतल्या. शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी काम मिळेल, रोजगार मिळेल, यामुळे या भागातील प्रगती होईल याचा विचार करून मकाई कारखाना आम्ही उभा केला आजच्या बिगर कागदावरील नेतृत्वामुळे या शेतकऱ्यांच्या मुलांना गेले कित्येक वर्ष राहिलेले पगारीसाठी आंदोलन करावे लागत आहे तरीसुद्धा पगारी मिळत नाही. 140 कोटी यावर्षी कारखाना चालू करण्यासाठी मिळाले त्यातील 35 कोटी कर्मचाऱ्यांच्या पेमेंट साठी मिळाले आहे तरीसुद्धा त्यांना मिळत नाही. त्यामुळे कर्मचारी कामावर येत नाही. याही वर्षी कारखाना बंद राहण्याची शक्यता आहे. तरी विद्यमान संचालक बोर्डाने याबाबत विचार विनिमय करावा कारण बिगर कागदावरील नेतृत्वाने सरकारला फसवले, कारखान्याला फसवले, कर्मचारी शेतकऱ्यांना फसवले यांच्यामुळे काही होणार नाही 140 कोटी कुठे गेले याबाबत पूर्ण लेखाजोखा विद्यमान संचालक बोर्डांना द्यावा लागेल अन्यथा त्यांना भविष्यात अडचणीचा सामना करावा लागेल. तरी बोर्डाने कर्मचारी पेमेंट व कारखाना चालू करावा अशी मागणी माजी चेअरमन अप्पासाहेब झांजुर्णे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *