जेऊर प्रतिनिधी

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज जेऊर येथे करमाळा तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील, जेऊर गावचे सरपंच युवानेते पृथ्वीराज भैय्या पाटील, भारत हायस्कूल जेऊर व जेऊर ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. भारत हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत पालखीचे स्वागत केले. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता,    हागणदारीमुक्त गाव, वृक्ष संवर्धन व

लागवड, साक्षरता आधी सामाजिक विषयांवरती प्रबोधन करणारे पथनाट्य सादर केले. यादरम्यान भारत हायस्कूलचे विद्यार्थी, प्राचार्य आबासाहेब सरोदे सर यांच्यासह अनेक शिक्षक – शिक्षीकांनी टाळ – मृदंगाच्या ठेक्यावर वारकरी फुगडीचा आनंद लुटला. या स्वागत सोहळ्याचे करमाळा तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील, श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे विश्वस्त हभप राहुल महाराज साळुंके तसेच उपस्थित सर्व वारकऱ्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले. आत्ता पर्यंतच्या पायी वारीतील हा अनोखा स्वागत सोहळा आहे. वारकरी सांप्रदायाचे मूळ सामाजिक विचार दर्शविणारे पथनाट्य सादर करून सामाजिक जागृती करणाऱ्या भारत हायस्कूलचे व

विद्यार्थ्यांचे हभप राहुल साळुंके यांनी आभार व्यक्त करून अभंगगाथा व श्री संत निवृत्तीनाथांची प्रतिमा भेट देवून सन्मानित केले. यावेळी करमाळा तहसिलचे नायब तहसीलदार, संस्थेचे सचिव प्रा.अर्जुन सरक सर, प्राचार्य सरोदे सर, उपप्राचार्य कांबळे सर, तसेच सर्व शिक्षक – शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी मार्गदर्शक फुले सर व हेळकर सर यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *