
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे वारकऱ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. या कॅम्पचे आयोजन मौलाली माळ करमाळा येथे करण्यात आले होते. सर्व डॉक्टरांनी 3-3 तास ड्युटी करून 4 दिवस आरोग्य सेवा दिली. 1800 वारकऱ्यांनी औषधोपचाराचा लाभ घेतला. करमाळा तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उमेश जाधव, उपाध्यक्ष डॉ. मनोज काळे, डॉ. श्रीराम परदेशी, डॉ. बालाजी कटके यांनी नियोजन केले व करमाळा तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी या सहभाग घेतला.



