करमाळा शेतकरी सेनेचे पदाधिकारी निवड संपन्न
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा रयत क्रांती पक्षाचे जिल्हाप्रमुख व माढा लोकसभा व करमाळा विधानसभा या दोन्ही महायुतीने लढविलेल्या निवडणुकीमध्ये प्रचारक म्हणून उत्कृष्ट काम केलेले संतोषजी मच्छिंद्र वारगड यांनी व त्यांचे सहकाऱ्यांनी रयत क्रांतीला रामराम ठोकत हाती धनुष्यबाण घेतले होते

त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून शिवसेनेचे तालुक्याचे नेते जिल्ह्याचे नेते व प्रदेशचे नेते यांनी सर्वांनी दखल घेत शिवसेना पक्षप्रदेश कार्यालय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भवन या ठिकाणी शिवसेना जिल्हा संघटक या पदावर नियुक्ती मा धनंजयजी जाधव प्रदेशअध्यक्ष ( शेतकरी सेना )यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उपस्थित असंख्य शिवसैनिक व नेतेमंडळी उपस्थित होते या नियुक्ती बरोबरच करमाळा*तालुका अध्यक्ष शेतकरी सेना म्हणून कैलास हनुमंत पाखरे व करमाळा तालुका उपाध्यक्ष*श शेतकरी सेना म्हणून अभिजीत सुरेश शिर्के यांच्याही नियुक्त करण्यात आल्या ह्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग कामगार वर्ग यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे ह्या निवडीनंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *