करमाळा प्रतिनिधी

रावगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
रावगाव तालूका करमाळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाएनजीओ फेडरेशन व नवभारत प्रतिष्ठान रावगाव यांचे विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला
भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मा बबन पाटूळे व हनूमंत रासकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
योग गुरू महेंद्र शिंदे यांनी योगाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले यावेळी
अरोग्य अधिकारी अपेक्षा शिंदे अरोग्यामध्ये योगाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी नवभारत प्रतिष्ठान चे पदाधिकारी तसेच हनूमंत रासकर सर.सरडे सर,प्रताप राऊत, लक्ष्मण पवार, गणेश जाधव,हर्षद पवार,रामदास कांबळे, नवनाथ वणवे, माणिक शिंदे, आशावर्कर दिपाली पवार, अरोग्य सहाय्यक डोळस, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थी यांनी या योग शिबीराचा लाभ घेतला,
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश कांबळे, राहुल पवार, हर्षद पवार, अमित कांबळे यांनी परिश्रम घेतले
सर्व उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष भास्कर पवार यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *