करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका व शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खरीप पेरणीकरता आवश्यक असलेले निर्मल सीड NUL 7 विश्वास उडीद बियाणे शेतकऱ्यांना सहजासहजी व सुरळीतपणे मिळावे व त्याचा पुरवठा कृषी केंद्रांमार्फत सहजपणे व्हावा अशी मागणी मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व शिवसेना जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना

बागल म्हणाले की, यावर्षी मे महिन्यापासूनच समाधानकारक पाऊस झाला असून सध्या शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागला असून शेतकऱ्यांना उडीद लागवड करण्यासाठी निर्मल सीड NUL 7 विश्वास या उच्च प्रतीच्या बियाणाची आवश्यकता आहे परंतु करमाळा आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना निर्मल सीडचे उडदाचे बियाणे सहजासहजी उपलब्ध होत नाही. याबाबत पुरवठा करणारे डीलर्स हे कृषी केंद्रांना वेळेवर व सुरळीतपणे बियाणांचा पुरवठा करत नाहीत याबाबत अनेक

शेतकऱ्यांच्या तक्रारी असून सदर बियाण्याच्या विक्री व पुरवठा यंत्रणेबाबत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी असून शेतकऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. चांगला पाऊस पडूनही उडीद बियाणाची गरज असतानाही निर्मल सीड बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी त्याची सातत्याने मागणी करत आहे संबंधित डीलर्स बियाणांचे चार टक्के अलॉटमेंट झाले आहे असे सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर सुरळीतपणे व्यवस्थितपणे उडदाचे निर्मल सीड NUL 7 विश्वास उडीद बियाणे उपलब्ध करावे असे बागल शेवटी म्हणाले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *