करमाळा प्रतिनिधी

सोगांव ता. करमाळा येथील दादासाहेब सरडे हे महावितरण कडे आउट सोर्स कर्मचारी म्हणून पाठीमागे कार्यरत होते त्यांच्या संदर्भात वारंवार महावितरण कडे तक्रार करुनही कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्याने सोगावं ग्रामपंचायत सरपंच विशाल सरडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनात माजी आऊटसोर्सिंग कर्मचारी दादासाहेब सरडे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या बोगस विद्युत कामे आहेत ज्या मध्ये स्वताच्या शेतात बोगस विद्युत पोल ऊभा करणे विज कनेक्शन नसताना बोगस तिन विद्युत पंप चालवने स्वतःच्या घरी अनाधिकृत पद्धतीने विद्युत कनेक्शन घेने अशा अनेक चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामाची तुमच्याकडे पूर्वी तक्रार केली होती परंतु त्यांच्या वरती कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. दादासाहेब सरडे ने जे काही बोगसगिरी केली आहे त्याची सखोल चौकशी करून त्रयस्थ अधिकारी नेमून त्याची चौकशी करण्यात यावी. आम्ही तक्रारीमध्ये बोगस कागदपत्रावरती काम करणे, बोगस पद्धतीने महावितरणचे विज वापरणे या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत.

सदरील विषयांमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी तसेच 30/5/ 2025 पर्यंत चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच हरीचंद्र भोसले, विकास भोसले, विशाल भोसले, युवराज गोडगे, ज्ञानेश्वर सरडे, अतुल सरडे, आर्यन भोसले, शुभम सरडे, प्रभाकर भोसले हे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *