करमाळा प्रतिनिधी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी सर्व पीडितांना आपल्या भारतीय सशस्त्र दला च्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ करमाळा शहरात ‘भव्य तिरंगा यात्रा’ संपन्न झाली.

श्री खोलेश्वर मंदिर किल्ला विभाग येथून सुरू झालेली तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून यात्रेचा समारोप झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवा भारत प्रसंगी दहशतवादाविरुद्ध किती कठोर, कणखर होऊ शकतो; हे ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे संपूर्ण जगाने पाहिले आहे. यानिमित्ताने दिसलेल्या नव्या भारताच्या लष्करी सामर्थ्या सोबतच कोट्यवधी भारतीयांची एकजूट हे ‘ऑपरेशन सिंदूर’चे मोठे यश आहे.

या तिरंगा रॅली यात्रेमध्ये करमाळा तालुक्यातील व शहरातील तमाम जनता व भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेनेचे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *