करमाळा प्रतिनिधी

श्री देवीचामाळ रोड वरील भाजी विक्रेते वरील कार्यवाही बाबत मुख्याधिकारी यांना युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी पत्र दिले

पत्रात असे लिहिले आहे की, गेल्या काही दिवसापासून करमाळा नगर परीषद श्री देवीचामाळ रोडवरील भाजी विक्रेत्यांवर कार्यवाही करत आहे. परंतु सदर भाजी विक्रेता हे सदर भागात हातगाडी वरुण भाजी-पाला विकत आहे, त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करता येत नाही.

जर आपण सदर भाजी विक्रेत्यांवर या पुढे कार्यवाही करणार असाल तर शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती असेही गायकवाड यांनी पत्रात सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *