करमाळा प्रतिनिधी

जातेगाव येथे गायरान जागेत पी एम आवास घरकुला साठी ती जागा योग्य नसले बाबत मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना दलित महासंघाच्या वतीने पत्र देण्यात आले.  

अर्जात असे लिहिले आहे, ग्रामपंचायत जातेगाव अबकड घरकुल मंजूर यादी (पी एम आवास) क्र. 4 घरकुलाची जागेच्या अभावी ग्रामपंचायत महसूल कर्मचारी भूमी अभिलेख व गटविकास अधिकारी यांनी गायरान जागेचा जो सर्वे केलेला आहे तो पूर्ण चुकीचा आहे. त्या जागेवर / जागेमध्ये जलजीवन मिशन ची पाईपलाईन गेलेली आहे व दलित वस्तीची पाईपलाईन सुद्धा आहे त्या जागेवरून ११ हजार व्होल्टेज टॉवर लाईन गेलेली आहे अशा मृत्युच्या सापळ्यामध्ये या अधिकाऱ्यांनी कसे सर्वेक्षण केलेले आहे हे योग्य आहे का नाही ते तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावे. ती घरकुलासाठी देण्यात आलेली जागा सुरक्षित व संरक्षित नाही. कृपया करून घरकुला साठी लाभार्थ्यांना दुसरी कडे जागा देण्यात यावी ही नम्र विनंती.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *