करमाळा प्रतिनिधी

बिटरगांव वांगी येथे हभप हरिदास डोंगरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन सोहळा प्रसंगी बोलत होते.

धर्माचे पालन

करणे पाखंड खंडण

हेचि आम्हा करणे काम

बीज वाढवावे नाम

तीक्ष्ण उतारे

हाती घेऊनि बाण फिरे

नाही भीड भार

तुका म्हणे सान थोर !

     श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करताना महाराष्ट्र हा जगात ओळखला जातो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने, देव, देश, धर्मासाठी जिवन कसे जगावे यासाठी सर्वोत्तम आदर्श चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र होय, संकटांना पायदळी तुडवून जीवनामध्ये यश आत्मसात कसे करावे हे छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र शिकवते, मराठ्यांच्या श्र्वास म्हणजे गडकोट किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३६० गडकोट किल्ले काबीज केले, मरेल पण माघे हटणार नाही तो म्हणजे मर्द मराठा असे प्रतिपादन शिवव्याख्याते हभप बालाजी महाराज बोराडे परांडा यांनी केले आहे.

बुधवारी १४ मे रोजी सकाळी दहा वाजता बिटरगांव वांगी तालुका करमाळा येथे हभप हरिदास नाना डोंगरे पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित किर्तन सेवेत हभप बालाजी महाराज बोराडे बोलत होते .

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील, हभप रामभाऊ महाराज निंबाळकर, हभप अक्षय महाराज भोसले, हभप साध्वी धर्मसिंहानी गायत्री दिदी, हभप गजानन महाराज देठे, आकाश गिरीजा महाराज, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, ज्ञानेश्वर पाटील दहिवली, हभप विश्वनाथ निंबाळकर, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिपक वाडदेकर, स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव तळेकर, आप्पासाहेब थिटे, परमेश्वर तळेकर, गोपाळ कवडे,  बाळासाहेब जाधव, दत्तात्रय डोंगरे, शिवाजी डोंगरे, हभप अक्षय महाराज शेळके, हभप तुकाराम महाराज निंबाळकर, हभप प्रदिप महाराज जाधव, हभप कल्याण महाराज सरडे, हभप हर्षद गुरव, सुरेश सुळ, संपतराव सरडे, गणेश दौंडकर, बाळासाहेब पाथरकर, दत्तात्रय कदम, शिवाजी मुळीक, गोविंद डबल, ओंकार डबल, नानासाहेब मुळीक, महादेव लोंढे, संतोष घोंगडे यांच्यासह श्री ज्ञानाई गुरुकुल विद्यार्थी, अकलूज व श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *