करमाळा प्रतिनिधी

रावगाव येथील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९०.३२ टक्के लागला असून, यंदाच्या निकालात मुलींनीच अव्वल क्रमांक पटकावत यशाची बाजी मारली आहे.

विद्यालयामधून शाईन पैगंबर शेख हिने ९०.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, दिव्या चंद्रकांत गोरे हिने ८७ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, चैत्राली प्रकाश कांबळे हिने ८५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.

दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव काकडे, संस्थेचे सचिव अमित कुमार काकडे, प्रशालेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर, तसेच सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाने मागील अनेक वर्षांप्रमाणे यंदाही चांगल्या निकालाची परंपरा टिकवली असून, या उल्लेखनीय कामगिरीमुळे रावगाव परिसरातून विद्यालयाचे भरभरून कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *