करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटी संचलीत, महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा इ. १0 वी बोर्ड परीक्षेत सर्वाधिक 308  विद्यार्थी बसलेले होते. त्यापैकी 280 विद्यार्थी उत्तीर्ण होवून 91 % निकाल लागला आहे. 

गर्जे प्रथमेश भागवत 97.00% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक तसेच वीर अर्चित धनंजय (95.80) द्वितीय व गांधी सार्थक उत्कर्ष (95.60) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिकांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आ. जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, विश्वस्त माजी उपनगराध्यक्ष नारायणबापू जगताप, विश्वस्त युवा नेते शंभूराजे जगताप, प्राचार्य बी.के. पाटील, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक आर.एम. भोसले, पर्यवेक्षिका सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमुख व्ही.एल. पवार यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *