
करमाळा प्रतिनिधी
अकलूज येथे माळशिरस तालुका सकल नाभिक समाज संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माळशिरस तालुक्याचे मा.आमदार रामभाऊ सातपुते हे होते. ओबीसी महामंडळ अंतर्गत श्री संत सेना महाराज केश शिल्पी मंडळ अधिकारी वृषाली लहारे मॅडम, सत्यशोधक मंडळाचे सिद्धार्थ तावरे, राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ गाडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या संवाद मेळाव्याचा शुभारंभ श्री संत सेना महाराज प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. यानंतर उपस्थित पाहुण्यांनी ओबीसी महामंडळ अंतर्गत श्री संत सेना महाराज केश शिल्पी मंडळ, विश्वकर्मा योजना, बांधकाम कामगार योजना या विषयी उपस्थित समाजबांधवांचे प्रबोधन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सकल नाभिक समाजाचे राज्य समन्वयक किरण सविता तुकाराम भांगे यांनी केले होते. या वेळी तालुक्यातील नाभिक समाजाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.