सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर ग्रामीण पोलीस व टाटा सामाजिक विज्ञान संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन विकसित गाव अभियान संकल्पना अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केलेले आहे. त्याची सुरुवात करमाळा तालुक्यातील सहा गावांमधून होत आहे. यामध्ये रावगाव, लिंबेवाडी, कोर्टी, कुंभारगाव, फिसरे, सरपडोह या गावांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्या सहकार्यातून क्षेत्रभेट, गाव सर्वेक्षण, ग्रामस्थांना समुपदेशन तसेच सोलापूर जिल्हा मिशन विकसित गावांमध्ये जलसंधारण, आरोग्य शिक्षण, सेंद्रिय शेती, फळबाग लागवड, जलतारा प्रकल्प, पानंद रस्ते, फळ प्रक्रिया उद्योग, तरुणांना रोजगार, पर्यावरण संवर्धन, तंटामुक्त गाव, गुन्हेगारी मुक्त गाव, व्यसनमुक्त गाव

याबरोबरच समाजात राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच विकसित गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शाश्वत विकास केला जाणार आहे. मिशन विकसित गाव योजनेत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्याचे कृषी अधिकारी तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी सर्व तालुक्यातील डी.वाय.एस.पी., पोलीस निरीक्षक, बीट हवालदार, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, बालवाडी अंगणवाडी सेविका, कृषी सेवक, महिला बचत गट, फार्मर कप मधील सर्व योद्धे, सर्व ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग घेऊन मिशन विकसित गाव अभियान यशस्वी करण्याचा चंग अतुल कुलकर्णी यांनी बांधलेला आहे. त्यांच्या या कार्याला बाळ राक्षसे कॅम्पसंचालक टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर,गणेश चादरे फिल्ड वर्क समन्वयक टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर, गुरु भांगे ग्राम विकास व कृषीतज्ञ माढा, प्रा.लक्ष्मण राख जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांचे सहकार्य लाभणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *