करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष संतोष वारे यांना शिवसेनेचे दिग्विजय बागल यांनी मारहाण केली.
वारे यांना गुरुवारी रात्री एका कौटुंबिक कार्यक्रमात मकाईचे माजी चेअरमन तथा शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांच्याकडून मारहाण झाल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली आहे. सदरच्या प्रकारानंतर करमाळा पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला. तर बागल यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष वारे यांचे राजकीय जनसंपर्क मोठा झाला आहे तसेच नाते इतरांसह टिकून ठेवले होते व मागील काही काळापासून वारे यांचे वजन राष्ट्रवादीमध्ये वाढले आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार निलेश लंके,आ नारायण पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यात राजकीय जनसंपर्क मोठा आहे
काल गुरुवारी रात्री एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त सर्व मित्रमंडळी शहराबाहेरील एका हॉटेलवर जमा झाली होती. रात्री आठच्या सुमारास वारे त्या ठिकाणी पत्नीसह पोहोचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर बागल यांच्याकडून वारे यांना एका वायरल व्हिडिओ वरून विचारणा करण्यात आली व त्यानंतर हाताने मारहाण केल्याची घटना घडली. दरम्यान वारे यांची तीन तोळ्याची चैन परिसरात पडल्याने त्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत करमाळा पोलीस ठाण्यात वारे समर्थकांनी गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या बागल यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
………………….
विजय घोलप यांच्या वाढदिवसानिमित्त लावंड यांच्या हाँटेलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वांच्या फँमेली होत्या. माझेही घरचे होते. यावेळी दिग्विजय बागल यांनी अंधारात बाजूला घेतले व तु राजकीय पोस्ट सुभाष गुळवे यांना का टाकली असे म्हणाले व मला मारहाण केली. मी माझा जीव कसाबसा वाचवुन पोलीस स्टेशन येथे आलो आहे – संतोष वारे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट