करमाळा प्रतिनिधी

सीनानदी वरती आसलेले खडकी, तरडगाव, संगोबा हे तिन्ही बंधारे फेब्रुवारी मधेच कोरडे पडले असून ह्या सीनानदी च्या शेजारील गांवाना पाणी टंचाई जानू लागली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे ह्या क्षेत्रात ऊस आणि केळी मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून करमाळा हाद्दीतील तिन्ही बंधारे कोरडे पडली आहेत. ह्या वर्षी लवकरच उन्हाची तीव्रता

जाणवत आहे त्यामुळे मुक्या प्राण्यांचे सुध्दा चिंता शेतकरीवर्गातून होत आहे त्यामुळे वेळीच काळजी घेऊन सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष्य घालून कुकडीचे पाणी सीनानदी मधे सोडून सर्व बंधारे भरून घ्यावे आणि सीनाकाटच्या शेतकर्यांचा व मुक्या प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *