
करमाळा प्रतिनिधी
चिकलठाण ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अक्षयकुमार दादासाहेब सरडे यांची निवड झाली. यावेळी उपस्थित चिकलठाण गावच्या लोकनियुक्त सरपंच धनश्रीताई विकास गलांडे तसेच सोसायटी चेअरमन विकास गलांडे, आदिनाथ कारखाना
उपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बारकुंड, मकाई सहकारी साखर कारखाना संचालक दिनकर नाना सरडे, सोसायटी संचालक मच्छिंद्र तात्या सरडे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत बारकुंड, ग्रामविकास अधिकारी घाडगे भाऊसाहेब, माजी उपसरपंच योगेश सरडे, संजय गव्हाणे, सुखदेव नेमाने, आदि मान्यवर उपस्थित होते.