करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात मळी विकून आलेले पैसे व निवडणुकीच्या काळात थकबाकी व शेअर्स थकबाकी म्हणून किती रक्कम जमा झाली याची विचारणा कार्यकारी संचालक अरुण बागनवर त्यांच्याकडे केली असता ते फोन उचलत नाहीत व उडवडीची उत्तरे देतात. आता याची माहिती प्रशासकीय संचालक डॉ. वसंतराव पुंडे यांनी द्यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे केली आहे.
कारखान्यावरील मळी कमी भावात विकून कारखान्याचे नुकसान केले आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी आदिनाथला ऊस दिला त्यांची उसाची रक्कम देणे बाकी आहे असे असताना केवळ बाराशे चाळीस रुपये प्रमाणे प्रति टन शेतकऱ्याला ऊस दर देऊन उर्वरित शिल्लक रक्कम भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हडप करण्याचा कारखान्यावरील काही लोकांचा डाव आहे. सध्या कारखान्यात जमा असलेली सर्व रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने द्यावी. या रकमेतून प्रवास खर्च, भत्ता, ठराविक कर्मचाऱ्यांच्या पगारी, ठराविक व्यापाऱ्यांचे पैसे देणे असे पैसे वाटण्याची प्रक्रिया कारखान्यावर सुरू आहे. काही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी उसाच्या रकमेचा हिशोब मागण्यासाठी कार्यकारी संचालक अरुण बागांवर यांना विचारणा केली असता कर्मचाऱ्यांवरच कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. कारखान्यावर सध्या शिल्लक असलेले पैसे तात्काळ ज्यांनी ऊस घातला त्या शेतकऱ्यांना द्यावीत. किमान प्रति टन 2500 रुपयांनी पैसे द्यावेत. कारखान्यात पैसे शिल्लक असताना केवळ बाराशे चाळीस रुपये टनाने पैसे शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात प्रशासकीय संचालक मंडळ आहे. त्यामुळे प्राधान्याने शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा करत आहेत. आदिनाथ अडचणीत असताना आम्ही कारखान्याला ऊस दिला हे आम्ही पाप केले काय आज 18 महिने झाले तरी आमच्या उसाचे पैसे दिलेले नाहीत आत्ता कारखान्यात पैसे शिल्लक असताना जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाहीत या प्रशासकीय मंडळाला जाब विचारणारा कोण आहे का नाही असा प्रश्न आता उस उत्पादक सभा जनार्दन समाधान घरगुडवे यांनी केला आहे.
………………………………..
चिवटेंच्या काळातच काळी साखर निघाली काळा कारभार झाला आहे – डाँ. वसंतराव पुंडे
करमाळा प्रतिनिधी
बेंद्रे, गुटाळ, चिवटे असतानाच काळी साखर निघाली त्यांच्या काळातच काळा कारभार झाला आहे असा आरोप आदिनाथचे मा. संचालक डॉ. वसंतराव पुंडे यांनी केला.
विलासराव घुमरे, अँड. देशमुख व मी असताना कारखाना चालूच झाला नाही. चिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या काळात पेट्रोलपंप चालू केला बंद पडला, पाईप लाईन बंद पडली, काळी साखर निघाली, कारखान्याची मळी, शेतकऱ्यांचे पेमेंट दिले नाही, भंगार विकले, चूकीचा कारभार केल्यामुळे क्रेसिंग झाले नाही, उलट वरील समस्यांचा खरा हिशीब द्यावा. अनेक समस्यांमुळे चिवटे व त्यांचे सहकारीच कारणीभूत आहे असा आरोप डॉ. वसंतराव पुंडे यांनी केला.